सुस्वागतम!
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
आकाराने महाराष्ट्राच्या जेमतेम एक सप्तमांश असलेला नेदरलँड्स हा युरोपातील एक छोटा देश. ह्या देशात महाराष्ट्रातून तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आणि मराठी संस्कृतीशी व भाषेशी नाते जपणाऱ्या प्रत्येकाचे मंडळ म्हणजेच महाराष्ट्र मंडळ, नेदरलँड्स. काव्य, शास्त्र, विनोद, साहित्य, नृत्य, नाट्य आणि संगीत ह्या सर्वांचा आविष्कार साकारणारे मंडळ! वैचारीक, सामाजिक आणि औद्योगिक देवाणघेवाण साध्य करू देणारे आणि ‘मराठा तितुका मेळवावा’ ह्या उद्देशाने कार्य करणारे असे हे तुम्हा सर्वांचे मंडळ आहे.
कळावे लोभ असावा,
आपले नम्र,
महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स