“चला , करूया उद्याची बात”
महाराष्ट्र मंडळ ,नेदर्लंड्स आपल्या सगळ्यांसाठी गुढीपाड्व्या निमित्त पुन्हा एकदा एकत्र भेटायची संधी घेऊन येत आहे.
करोना च्या निराशामय वातावरणातून बाहेर पडत आपण सगळे जण एकत्र आशावादी आणि आनंदी उद्या कडे वाटचाल करूयात. हि नवीन वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात साहित्य , कला , संगीत , नाट्यवाचन , नाट्यछटा अशा विवध गुणदर्शनाचा आस्वाद घेत तसेच चविष्ट अल्पोपहार , पारंपरिक वेशभूषा आणि भरपूर गप्पा मारत साजरा करूयात .
कार्यक्रमाची रूपरेषा आणि अधिक माहित लवकरच कळवू. तेव्हा आपण सगळ्यांनी लवकरात लवकर खालील लिंक वर जाऊन आपली नोंदणी करावी हि विनंती. आम्ही आपल्या सगळ्यांना भेटायला उत्सुक आहोत.