मित्र मंडळींनो,
- युरोपात अगदी परक्या भाषिकांच्या देशात येवून मातृभाषेची नाळ जपायची आहे का ?
- कांदा पोहे, झणझणीत बटाटेवडे आणि गरमागरम चहाचे घोट घेत तुमच्यासारख्याच दिलखुलास सोबत्यांबरोबर गप्पांचा फड रंगवायचा आहे का?
- स्वतःच्या किंवा आपल्याला आवडणाऱ्या लेख, कविता इतरांना आवर्जून ऐकवायच्या आहेत का? नाटकात, गाण्याच्या मैफिलीत, वक्तृत्वात भाग घ्यायचा आहे का?
- स्थानिक मराठी कलाकारांनी सादर केलेल्या मनस्वी कलाकृतींना मनसोक्त दाद दयायची आहे का ? मंडळाचे बरेचसे कार्यक्रम सवलतीच्या दरात पाहायचे आहेत का?
- तुमच्यापाशी असलेल्या ज्ञानाचा इतरांना फायदा करून दयायचा आहे का? तुमच्या घरगुती उद्योगांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत हवी आहे का ?