Diwali Sandhya 2022

नमस्कार !!

महाराष्ट्र मंडळ , नेदर्लंड्स प्रस्तुत , “दिवाळी संध्या – २०२२” – एक संगीतमय , चविष्ट आणि गप्पिष्ट संध्याकाळ

आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगात न्हाऊन आली !
तुमच्या घरी यंदाची दिवाळी कशी साजरी होणार आहे? हा प्रश्न विचारणे तसे चुकीचे आहे म्हणा. अस्सल रसिक मराठी मनातील दिवाळी ही अभ्यंगस्नान, धमाल फटाके, लाडू-चिवडा-चकली-मिठाई, नातेवाईकांच्या/ मित्र मंडळींच्या भेटी, पत्त्यांचे डाव आणि एखादा सुरेख संगीतमय दिवाळी कार्यक्रम अशानेच साजरी करतो.
अशी तुमच्या आमच्या मनातली दिवाळी छान साजरी व्हावी म्हणून महाराष्ट्र मंडळ, नेदर्लंड्स आपल्या विस्तारीत परिवाराला प्रत्यक्ष भेटून एकत्र दिवाळी साजरी करण्यासाठी घेऊन येत आहे – – दिवाळी संध्याकाळ सुरेल करणारा संगीत कार्यक्रम –

“दिवाळी संध्या – २०२२” – एक संगीतमय , चविष्ट आणि गप्पिष्ट संध्याकाळ

मराठी-हिंदी , जुनी-नवीन , सुगम संगीत -चित्रपट संगीत तसेच एखादी गझल अश्या गाण्यांचा पुष्पगुच्छ घेऊन येत आहोत.

ह्या संगीतमय कार्यक्रम आपल्या सर्वांबरोबर उत्तम दिवाळी फराळ करून साजरा होईल.
तेव्हा त्वरा करा आणि आपली व आपल्या आप्तेष्टांची, मित्रांची, मैत्रिणींची जागा आरक्षित करा.

कार्यक्रमाची रूपरेषा आणि अधिक माहित लवकरच कळवू. तेव्हा आपण सगळ्यांनी लवकरात लवकर खालील लिंक वर जाऊन आपली नोंदणी करावी हि विनंती. आम्ही आपल्या सगळ्यांना भेटायला उत्सुक आहोत.

Guests

Adults ( Above 12)

15 EUR

Children ( 7 - 12 )

8 EUR

Children ( Below 7 )

 Free

Baby Sitting : N.A.

Platform C,

Stadsplein 97 – 99, 1181 ZM Amstelveen

Public parking places available around the location.