नमस्कार मंडळी ,
आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत असलेला आपला ” महाराष्ट्र मंडळ, नेदर्लंड्स गणेशोत्सव ” हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय.
मागील वर्षी च्या आपल्या दिमाखदार गणेशोत्सव सोहळा च्या आठवणी अजून देखील ताज्या आहेत. आपला उस्फुर्त सहवास ह्या वर्षी देखील लाभेल ह्या बद्दल खात्री. आणि त्या साठी आपल्या महाराष्ट्र मंडळ, नेदर्लंड्स ची सर्व टीम आता नव्या उतसाहणे सज्ज झाली आहे.
“महाराष्ट्र मंडळ, नेदर्लंड्स गणेशोत्सव २०२३“ हा मोठ्या दिमाखात ढोल – ताशा – झांजा च्या गजरात वाजत गाजत पारंपरिक पोशाखात तसेच विविध कला गुणदर्शन , सहभोजन आणि जुने-नवे मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा साजरा करूयात. तर भेटूयात लवकरच.