कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी सुरु केलेला ग्रंथ तुमच्या दारी ह्या उपक्रमाची सुरवात महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्समध्ये झाली. मराठी माणसांसाठी आपल्या आवडत्या साहित्यिकांची ग्रंथ संपदा उपलब्ध व्हावी, अशी विनंती मंडळातर्फे कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वाचनालय समितीच्या अध्यक्षांकडे झाली वत्यानुसार प्रत्येकी २५ पुस्तके असलेल्या १२ पेट्यांचे गेल्यावर्षी मार्चमध्ये नेदरलँड्समध्ये आगमन झाले.

ह्या संकल्पनेची योजना अशी की दर तीन महिन्यांनी आपली पेटी पुढच्या क्रमांकाची पेटी ज्या सदस्याकडे आहे त्याच्याकडे द्यावी आणि त्यानुसार संपूर्ण वर्षभरात सर्व सदस्य २५ पेट्यांतील पुस्तकांच्या वाचनाचा आस्वाद घेऊ शकतील.ह्या योजनेबाबत आपणास अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्सशी संपर्क साधू शकता.

1
2