अ) नागरिकत्व, धर्म, पंथ आणि जाती ह्या सारख्या कक्षांपलीकडे जाऊन मराठी भाषा व संस्कृतीची ओळख जपणाऱ्या सर्वांना एकत्र आणणे.
ब) गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, दिवाळी ह्या सारख्या पारंपारिक उत्सवांच्या माध्यामातून सभासद आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अंगच्या कलागुणांना वाव मिळावा, ह्यासाठी कलामंच उपलब्ध करून देणे,
क) महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांचे कार्यक्रम नेदरलंडस मध्ये घडवून आणणे,
ड) मराठी साहित्याच्या वाचनाची आवड वाढीस लावणे,
इ) नेदरलँड्स येणाऱ्या मराठी भाषिक, मराठी संस्कृती प्रेमी मंडळींना आवश्यक तेंव्हा आणि आवश्यक तेवढे मार्गदर्शन करणे
फ) आणि सर्वतोपरी मराठमोळ्या संस्कृतीचे प्रेम नेदरलँड्स मधल्या प्रत्येक मराठी मनामध्ये वाढीस लावणे.